राष्ट्रवादी काँग्रेसचा जन सन्मान यात्रेचा कार्यक्रम आज आळंदीमध्ये पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी निधी वाटपाबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “माझ्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. लग्नात जेवायला पंगत बसल्यावर वाढपी कसा जेवण वाढतो, त्याप्रमाणे मी निधी वाढत होतो.२८८ मतदार संघात वाढताना राजगुरुनगर आलं की, तिथे जास्त जास्त वाढलं.”