मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आता निवडणुकीत ओबीसी उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सर्वपक्षीयांना सूचक इशारा देखील दिला. आम्ही ओबीसीमध्ये जन्म घेतला म्हणजे गुन्हा केला का? असा प्रश्न यावेळी लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांना केला आहे.