माझी लाडकी बहीण योजनेचे काही अर्ज चुकीचे भरले गेले जेणेकरून ते बाद व्हावेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षावर केला होता. त्याला प्रत्युत्तर देत खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांनी आधी स्वतःच्या घरात डोकावून पाहावं अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. तसंच आम्ही कोणत्याही योजनेवर टीका किंवा विरोध केलेला नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.