Rakshabandhan Ladki Bahin Yojna: रक्षाबंधनाच्या निमित्त मिसेस उपमुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांना राखी बांधून अनोखं सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी माझे आता राज्यातील बहिणींसोबत नणंद भावजयचं नवीन नातं जोडले आहे, हे नवीन नातं आहे आपण एकमेकांचे सुख दुःख वाटून घेऊ असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच लाडकी बहीण योजनेवरून देवेंद्र फडणवीस यांना सावत्र भाऊ म्हणून संबोधणाऱ्यांना सुद्धा त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीच्या रक्षणासाठी लाडकी बहीण योजना आणली, त्यात राजकीय दृष्टिकोण नाहीसरकारने चांगले हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ती पुढेही सुरू ठेवतील. त्यात आवश्यक वाढ करतील अशी अपेक्षा आहे असे अमृता फडणवीस म्हणाल्या.