बिग बॉस मराठी सीझन ५ चा नवा आठवडा सध्या मराठी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. नव्या आठवड्यातील सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये टीम बीच्या हुशारीसमोर टीम ए म्हणजेच अरबाज, निक्की, जान्हवी यांची जादू फिकी पडली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा टीम ए जरा जास्त तणावात दिसतेय. नेमकं आजच्या भागात असं काय घडणार याची एक छोटीशी झलक पाहूया.