बदलापूरमधील शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. तीन तासांहून अधिक काळ सुरू असलेले हे आंदोलन आता चिघळले असून आंदोलकांनी शाळेत घुसून तोडफोड केली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.