८ ऑगस्ट २०२२ व १३ मे २०२३ या दोन दिवशी आलेल्या तक्रारींची जर पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर आज कोलकाता मधील ३१ वर्षीय महिला डॉक्टर वाचली असती असा दावा सध्या एका महिलेने केला आहे. ही महिला म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची सासू आहे. कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कार करून झालेली हत्या हा सध्या देशातील सर्वात ज्वलंत मुद्दा ठरतोय. आरोपी संजय रॉय, माजी प्राचार्य संदीप घोष तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सध्या चौकशी चालू आहे. अशातच आता संजय रॉय विषयी काही मोठे खुलासे त्याच्या सासूने केल्याचे समजतेय. ANI ला दिलेल्या मुलाखतीत संजय रॉय ( Sanjoy Roy ) हा आपल्याही मुलीवर कसा अन्याय करायचा याविषयी त्याच्या सासूबाईंनी खुलासा केला आहे. याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.