Badlapur Crime Case: बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निंदनीय घटनेनंतर सकाळपासूनच रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरु झालं आहे. आंदोलकांना समजावण्यासाठी स्वतः गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले होते. आंदोलकांच्या मागण्या मान्य करूनही हा संताप काही कमी होत नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. रेल्वे बंद असल्याने लाखो प्रवाशांची पंचाईत होऊ शकते हे आंदोलकांनी विचारात घ्यायला हवे अशी विनंती महाजन यांनी केली आहे. बदलापुरातील एकूण स्थितीबाबत माहिती देताना गिरीश महाजन काय म्हणाले पाहूया..