बदलापूर येथील चार वर्षीय चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी प्रचंड जनआक्रोश पाहायला मिळत आहे. २० ऑगस्टच्या सकाळपासूनच बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळायला हवे असं म्हणत फडणवीसांना कारवाई होणारच अशी ग्वाही दिली आहे.