सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या बलात्कारप्रकरणी सुनावणी पार पडली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने एफआयआर दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने केस हाताळली त्यावर सुद्धा टीका केली आहे. हत्येला आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न, ते रुग्णालयात तोडफोड यासगळ्याबाबत सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने प्रतिक्रिया दिली आहे. सरन्यायाधीशांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया.