बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात चौथ्या आठवड्यातील आजच्या भागात रक्षाबंधन साजरे होणार आहे. यावेळी नुकतेच भांडलेले निक्की व घनश्याम यांच्यात पुन्हा दिलजमाई होऊ शकते. तर इरिना आपल्या भावाच्या आठवणीत रडताना दिसतेय. रक्षाबंधनाच्या निमित्त तरी बिग बॉसच्या घरातील सदस्यांची हळवी बाजू दिसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आजच्या भागाची छोटीशी झलक इथे पाहूया