योगींचं राज्य जे उत्तर प्रदेशात सुरु आहे त्याला बुलडोझर राज्य म्हणतात. तसे बुलडोझर बदलापूरला का गेले नाहीत? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी बदलापूरकर मंगळवारी रस्त्यावर उतरले होते. लोकल सेवा बदलापूरकरांनी १० तास रोखून धरली होती. हा पब्लिक क्राय आहे जो सर्वोच्च न्यायालयाला दिसत नाही का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.