बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक आत्याचाराच्या घटनेनंतर मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा,असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये अजित पवार यांनी देखील राजीनामा द्यावा असे फलक होते आणि कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देखील दिल्या. त्यामुळे अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देण्याचे टाळले. पण त्यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना भूमिका मांडण्यास सांगितले.