बदलापुरात आंदोलन पेटलं! काही दिवसांपूर्वी कोलकतामध्येही आंदोलन झालं, काही वर्षांपूर्वी दिल्लीतही झालं.. पण दुर्दैवाने एकीकडे आंदोलन होत असताना त्याच वेळी, त्याच परिसरांमधूनही बलात्कार, अत्याचाराच्या घटना काही थांबल्या किंवा कमीही झालेल्या नाहीत. बदलापूरमधील चिमुकल्यांच्या अत्याचारावरून रान पेटलं असताना सहज दुर्लक्षित झालेल्या या प्रकारणांविषयी सुद्धा आपल्याला माहित असायला हवं, याहीबाबत तुम्ही व आम्ही बोलायला हवं. आजच्या व्हिडीओमध्ये आपण मागील १० दिवसांमधील काही अत्याचारांच्या घटनांवर एक नजर टाकणार आहोत.