महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरु आहे. तसेच नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सहभागी झाले आहेत.जोपर्यंत सरकार सकारात्मक निर्णय देत नाही, तोपर्यंत आंदोलन ठिकाणावरून हटणार नसल्याची भूमिका यावेळी रोहित पवार यांनी मांडली आहे.