Badlapur Akshay Shinde Case Latest Update: बदलापुरमध्ये चार वर्षांच्या दोन लहान चिमुकल्यांवर अत्याचार करण्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज व आनंद दिघे यांचा उल्लेख करत कशा प्रकारची शिक्षा या आरोपीला दिली जाईल हे सांगितले आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, इथे या नराधमाला फाशी होणारच पण म्हणून लोकांनी याचं राजकारण करून त्या चार वर्षांच्या चिमुकल्यांचं आयुष्य बरबाद करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले हे या व्हिडीओमध्ये ऐकुया..