Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क आज पार पडणार आहे. तत्पूर्वी टीम बी मध्ये आज पुन्हा फूट पडल्याचे दिसतेय. किचनमध्ये असताना आज अंकिता वालावलकर ही वैभव चव्हाण व अरबाज समोर अभिजित सावंतविषयी रागात बोलतेय. निक्की आणि अभिजितची मैत्री ही आता दोन्ही गटांसाठी वादाचा मुद्दा ठरतोय यावरून सध्या अंकिताचा पारा चढल्याचे दिसतेय. आजच्या भागाची ही छोटीशी झलक इथे पाहूया.