पुण्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आयबीपीएस परीक्षा व एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या आहेत. नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर विद्यार्थ्यांनी लोकसत्ताशी बोलताना भूमिका मांडली आहे.