ठाण्यातील बदलापूर येथील शाळेत दोन चार वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीच्या घराची मंगळवारी ५०-१०० लोकांच्या जमावाने तोडफोड केली. इतकंच नाही तर आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांवर सुद्धा हल्ला करण्यात आला, असे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांना अक्षय याला अटक केली असून २६ ऑगस्टपर्यंत तो पोलीस कोठडीत असणार आहे. या शाळेतील घटनेच्या विरोधात २० ऑगस्टला शेकडो लोकांनी निदर्शने करत बदलापूर रेल्वे स्टेशनवर आणि शाळेबाहेर आंदोलन केले होते.