पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पोलंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी पोलंडमधील भारतीय नागरिकांशी संवाद साधला. तसेच राजधानी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला भेट दिली.
दरम्यान, वॉर्सा येथील भारतीय नागरिकांना संबोधित करताना मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक हे महाराष्ट्रातील नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीप्रती पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान