२७ ऑगस्टला येऊ घातलेल्या दहीहंडीच्या सणाला अपघाताचं गालबोट लागू नये यासाठी खबरदारी घेण्यासह दुर्दैवाने अशा घटना घडल्याच तर तातडीने मदत देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने उपायोजनाही तयार केल्याचं समजतंय. दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) आक्षेप घेतलेला असतानाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरविण्याची मोहीम सुरू केली आहे. या संस्थेने गोविंदांना विमा संरक्षणासाठी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. विमा संरक्षणाचा कालावधी हा १४ ऑगस्टपासून ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत आहे.