कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. देशभरात वैद्यकीय क्षेत्रातील तसेच अनेक जनसामान्यांनी सुद्धा निषेध नोंदवत आंदोलने पुकारली आहेत. आश्चर्य म्हणजे यातील काही आंदोलनांच्या प्रमुख तर स्वतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आहेत. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे, ज्यात आर जी कार रुग्णालायत नक्कीच काहीतरी गौडबंगाल असण्याबाबत बोललं जात आहे. आर.जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयाचा काळा इतिहास आजच्या व्हिडीओमधून आपण जाणून घेणार आहोत.