मागील तीन दिवसांपासून सूरु असलेल्या एमपीएससी च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर २५ ऑगस्टला होणारी परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससी ने घेतला आहे. त्याचबरोबर कृषी विभागाच्या २५८ जागांची भरती करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले. या दोन मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र संयुक्त पुर्व परिक्षेच्या गट ब आणि गट क च्या पंधरा हजार जागा भरण्याची तिसरी मागणी देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.आता दोन मागण्या मान्य झाल्यावर रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. संयुक्त पुर्व परिक्षेच्या माध्यमातून पंधरा हजार जागा भयण्याच्या तिसर्या मागणीबाबत येत्या सात दिवसांत शरद पवार हे मुख्यमंत्री आणि संबंधित व्यक्तींची भेट घेतील असे आश्वासन रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना दिले. मात्र जोपर्यंत तिसरी संयुक्त पुर्व परिक्षेची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतला आहे.