कोल्हापुरात एका दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार होऊन तिचा खून झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोल्हापूर येथील शिये गावात सदर घटना घडली असल्याचे सांगितले जाते. या घटनेबाबत आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. “कुठल्याही परिस्थितीत या घटनेच्या तळाशी जाऊन आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल. तसेच पीडित बिहारच्या कुटुबीयांनाही मदत दिली जाईल.”, असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.