नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने २४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात मर्स्यांगदी अंबुखैरनीजवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळल्याची घटना घडली.