बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील दादरच्या शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांचं निषेध आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र बंदसाठी उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी शांततेत निषेध आंदोलन करण्याचा निर्णय मविआने घेतला. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुण्यात आंदोलनाला बसले आहेत. तर उद्धव ठाकरे हे दादरमध्ये कार्यकर्त्यांसह आंदोलन करत आहेत.