बदलापूर लैगिंक अत्याचाराच्या निषेधार्थ मविआने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. त्यानंतर मविआने महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेत तोंडाला आणि हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पुण्यात आंदोलन सुरू आहे.