बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शरद पवार यांनी पुण्यात मूक आंदोलनात सहभाग घेतला होता. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह शपथ घेतली. भर पावसातही शरद पवारांचं शपथ वाचन सुरूच होतं. दरम्यान, महाविकास आघाडीच्यावतीने आज राज्यभरात निषेध आंदोलन
पुकारण्यात आलं होतं.