तीन-चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात माझ्या एका बहिणीबरोबर अशीच एक घटना घडली. आम्ही तो खटला जलदगती न्यायालयात चालवला. त्यानंतर दोन महिन्यांनी त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असं विधान मुख्यमंत्र्यांनी एका जाहीर भाषणात केलं होतं. त्यावरून विरोधक आता मुख्यमंत्र्यांना घेरताना दिसत आहेत. आज बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात पुकारलेल्या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेंनी त्यावर भाष्य केलं.