बदलापूर घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दादरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी तोंडाला काळा मास्क लावून निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन विकृती विरुद्ध संस्कृती आहे, याचा पुनरोच्चार उद्धव ठाकरेंनी पुन्हा केला. तर हे आंदोलन इथच थांबलं नसून पुढचे काही दिवस आपापल्या जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम घ्यावी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.