राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यातील महिला अच्याराच्या घटनांची आकडेवारीच वाचून दाखवली. मविआ सरकारच्या काळातही अशा घटना घडल्या आणि आताही घडत आहेत. मात्र आता रोज वर्तमानपत्रात जे सुरू आहे, त्यामागे काही राजकारण आहे का? असा संशयही राज ठाकरेंनी व्यक्त केला.