महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक शनिवारी (२४ ऑगस्ट) मुंबईत पार पडली. या बैठकीत जागा वाटपाबद्दल बोलणी झाल्याची चर्चा आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच मुंबईत शिवसेना हा मोठा भाऊ असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.