देशभरात घडणाऱ्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून सध्या वातावरण तापलं आहे. कडक कायद्यांच्या अंमलबजावणीची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये बोलताना भाष्य केलं आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी कठोर कायदा करण्यात आल्याचंही मोदींनी अधोरेखित केलं.