महिला अत्याचारांच्या घटनेनं देश हादरला आहे, मग ते बदलापूरमधलं प्रकरण असो किंवा कोलकत्तामधली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर राहिला आहे. या घटनांचे पडसाद देशभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या गोरेगावमधील स्वस्तिक महिला दहीहंडी पथक यंदा महिला अत्याचाराचा निषेध करत हंडी फोडणार आहे. यानिमित्ताने लोकसत्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.