भुऱ्या म्हणजेच कार्तिक वजीर हा चिमुकला २०२३ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त केलेल्या भाषणामुळे असा काही प्रसिद्ध झाला की यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भुऱ्याची भेट घेतली होती. आता तर चक्क राजकीय आरोप- प्रत्यारोपांमध्ये सुद्धा चिमुकल्या भुऱ्याच्या भाषणाचा उल्लेख होऊ लागलाय. हा उल्लेख झालाय उद्धव ठाकरे गटाकडून. १५ ऑगस्टला भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या मुलानं केलेलं लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं भाषण व्हायरल होत असताना त्यावरून ठाकरे गटानं राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘जालन्याच्या भुऱ्याने ‘लाडकी बहीण’ योजनेवर स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे. भूऱ्याचं हे भाषण काय होतं हे आता आपण पाहूया.