केंद्र सरकारने कर्मचार्यांसाठी एकीकृत (Unified Pension Scheme) योजन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पेन्शन योजनेत (NPS) सुधारणा करून या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मार्च २०२४ पासून त्याची अंमलबावणी करण्यात येणार आहे. युनिफाइड पेन्शन योजना नेमकी काय? जुनी पेन्शन योजना आणि युनिफाइड पेन्शन योजनेत नेमका फरक काय आहे? त्याने कर्मचाऱ्यांना नेमका कसा फायदा होणार हे पाहुयात.