आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्ष लागले आहेत. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे कर्जत जामखेडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या संदर्भात आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार हे मोठे नेते आहेत. जिथे कुठे ते फिरतील हा त्यांचा अधिकार आहे. मतं खाण्यासाठी कोणालाही उभं केलं तरी आपण भिडायला तयार आहोत, असा इशाराच रोहित पवारांनी यावेळी दिला.