बदलापूर अत्याचार प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार काही निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आले आहेत. त्याबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली. मुलांना शौचास घेऊन जाणे हे शाळेतील सेविकांचं काम असतं. त्यामुळे सर्वात मोठी चूक त्या सेविकांची आहे. त्या जर तिथे हजर असत्या, तर हा प्रकार घडला नसता, असं केसरकर म्हणाले. तर याचा अंतिम निर्णय गृहखात्याकडून घेतला जाईल.