पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा आज सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी दीडच्या सुमारास कोसळला. त्यामुळे सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होऊ लागली आहे. रोहित पवार यांनी देखील महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे. “महायुतीच्या नेत्यांची लायकी बघा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात देखील पैसा खाल्ला.”, असं रोहित पवार म्हणाले.