मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी दीडच्या सुमारास कोसळला. त्यामुळे आता सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “औरंगजेब आणि मुघल राजांनी अनेकदा हल्ले केले, पण छत्रपतींचा असा अपमान मुघल सरदारांनी देखील केला नव्हता.”