Bigg Boss Marathi New Episode Today: बिग बॉसच्या घरात पाचव्या आठवड्यात मानकाप्याचा थरार पाहायला मिळत आहे. या भीतीने बिग बॉसने घरात काही जोड्या तयार केल्या आहेत. यातीलच एक जोडी म्हणजे निक्की- अभिजितची. अगोदरच मित्र असलेल्या या दोघांना आता एकत्रच राहावं लागणार असल्याचं सांगितल्याने दोघांच्या अनेक गप्पा पाहायला मिळतायत. दरम्यान पॅडी भाऊ जेव्हा अभिजितला गंमतीत आता तू मला कॅप्टन बनवशील ना असं विचारतात तेव्हा अभिजितने दिलेलं उत्तर ऐकून नक्कीच यापुढे टीम बी मधून तो बाहेर पडणार असल्याची शक्यता जाणवते, आजच्या भागाची छोटीशी झलक पाहूया.