मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी (२६ ऑगस्ट) कोसळला. या घटनेवरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा आठ महिन्यांतच कोसळल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आज मालवणमध्ये दाखल झाले असता त्यांनी घटनास्थळी संपूर्ण पाहणी केली.