आमचा कार्यक्रम अमुक तारखेला आहे त्याआधी पुतळा करा, अशी ऑर्डर सोडणे हा सत्ताधाऱ्यांनी केलेला कलावंताचा अवमान असतो’ पुतळे भक्कम, मनासारखे घडवायचे असतील तर शिल्पकाराला वेळ द्यायलाच हवा’ अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण समुद्रकिनाऱ्यानजीक उभारलेला पुतळा पडून ध्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रातले शिल्पकार आणि दृश्यकलावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या बांधकामात नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या व त्यात खरा दोष कुणाचा याविषयीची मतं आपण लोकसत्ताच्या या विशेष अहवालात जाणून घेणार आहोत.