मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अशातच काल शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेबाबत बोलताना, वाईटातून चांगलं घडायचं असेल, त्यामुळे हा पुतळा कोसळला असेल, अशा प्रकारचं विधान केलं आहे. यावरून विरोधकांना आता आक्रमक पावित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून टीकास्र डागलं आहे. खरे शिवभक्त असाल तर केसरकरांना मंत्रालयासमोर चपलेनं मारा, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.