मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत आता आंदोलन केलं. गृहमंत्री दिल्ली दौरे आणि फोडाफोडी करण्यात व्यस्त आहेत. या सगळ्यांचा पुढच्या निवडणुकीत काय कार्यक्रम करायचा तो करू, असं विधानही सुप्रिया सुळेंनी केलं.