सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर सरकारवर विरोधकांनी टीका केली. अशातच आता या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत भाष्य केलं. “महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत असून वर्षभरात त्यांचा असा पुतळा पडणे ही आपल्या सर्वांसाठी धक्कादायक बाब आहे.”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.