मितवा, फुगे, इश्क, सविता दामोदर परांजपे अशा मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या घरात एका चोरट्याने फिल्मी पद्धतीने एन्ट्री केली. हा चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी स्वप्ना जोशी यांच्या घरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोराचा व्हिडीओ शेअर करुन या संपूर्ण घटनेबद्दल सांगितलं आहे.