काल (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर “तुम्हाला आमचा इतिहास माहीत नाही का?”, असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली. अशातच सुषमा अंधारे यांनी आता नारायण राणे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.