राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आपलं आयुष्यभर पटलं नाही. आता त्यांच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसलो आहे. पण बाहेर आलो की उलट्या होतात, असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तानाजी सावंत यांचं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला आला आहे.