आपले कर्तव्य बजावण्यासाठी नदीला पूर असतानाही नदीवर आडव्या झालेल्या झाडावरुन कसरत करुन ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याचा व्हिडीओ सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. वंती वळवी असं या अंगणवाडी सेविकेचं नाव असून तलोदा तालुक्यातील नयामाळ (शिर्वे) येथे कार्यरत आहेत.